महोगनी लागवड तंत्रज्ञान व करार शेती contract farming
नमस्कार शेतकरी बांधवांनो मी कृषी सल्लागार,एस.व्ही.धोते. कृषी रत्न पुरस्कार प्राप्त एग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर व प्रमुख कृषी रोज अॅग्रो फॅमिली नांदेड आज आपण महोगनी लागवड तंत्रज्ञान व करार शेती याबद्दल सविस्तर माहिती पाहूया करार शेती कंपनीचे नाव मोहोगणी विश्व अग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे.
महोगणी विश्व अग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी शेती क्षेत्रामध्ये वनशेती द्वारे उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देते आहे कृषी विद्यापीठ कृषी शास्त्रज्ञ व सामाजिक वनीकरण विभागाने शिफारस केलेल्या वनशेतीमधील महोगणी या वृक्षाची व्यावसायिक तत्त्वावर करार पद्धतीने लागवड करून उत्पादित माल खरेदी करण्याची व्यावसायिक शेती संकल्पना राबवत आहे महोगणी वृक्ष आपल्या निसर्गाने समृद्ध अशा देशात सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये क्षारपड आम्ल व अल्काली युक्त जमीन वगळता चांगल्या प्रकारे वाढणारी वृक्ष प्रजाती आहे आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे भारत देशामध्ये लाकूड हे खाद्यतेला नंतर दुसऱ्या क्रमांकावर आयात केली जाणारी वस्तू आहे उत्पादन कमी असल्यामुळे बाजारपेठेची मागणी जास्त आहे जागतिकीकरणाच्या माध्यमातून शेतीमध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत त्यामुळेच आपल्या कंपनीने आधुनिक कृषी तंत्रज्ञांचा स्वीकार करून गुणवत्ता पूर्णउत्पादन प्रक्रिया आणि मार्केटिंग या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांसाठी महोगणी या वृक्षाची वनशेतीसाठी निवड केली आहे आवश्यकता आहे ती फक्त शाश्वत विचारांची व दृष्टिकोन बदलण्याची.
संस्थेची वैशिष्ट्य
महोगणी विश्व अग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे ही संस्था महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक व तेलंगणा या राज्यामध्ये कार्यरत आहे 5500 एकर क्षेत्रावर मोजणी वृक्ष यशस्वीरित्या लागवड मिटकॉन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार महोगणी वृक्ष लागवड केलेल्या शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट मोबदला मिळवून दिला जाईल माती परीक्षण केवीके ( KVK )मार्फत दिली जाईल वाजवी फी उत्तम सेवा सहकारातून समृद्धी या ध्येयधोरणानंतर धोरणावर कार्यरत भारत सरकार मान्यताप्राप्त संस्था व संस्थेची नर्सरी किमान हमीभाव सहाशे रुपये घनफुट दराने लाकूड खरेदी कृषी तज्ञा मार्फत पीक पाहणी साठी प्रत्यक्ष शेतीला भेट व मार्गदर्शन महोगनी वृक्षतोड परवानगी कापणी प्रतवारी वाहतूक इत्यादी सर्व कामे कंपनीद्वारे होतील.
मोहगणी या पिकाचे फायदे व गुणधर्म थोडक्यात पाहूया वनस्पतीची उंची 35 ते 40 फूट झाडे परिपक्व होण्याचा कालावधी दहा ते बारा वर्षे चांगली व्यवस्थापन व जमिनीवर अवलंबुन लवकर पण झाडे तोडणी योग्य होवू शकतात ?लागवडीमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब सूक्ष्मजीवाणू वाढल्यामुळे जमिनीचे उत्पादकता वाढते जमिनीची धूप थांबविणे भूजल पातळी वाढविणे महोगणी वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड मोठ्या प्रमाणात अवशोषित करते त्याद्वारे परिसरातील हवा शुद्ध होते यांचा उपयोग कॅन्सर टीबी मलेरिया ॲनिमिया डायबेटीस इत्यादी आजारांच्या औषधांमध्ये होतो वनस्पतीच्या लालसर लाकडाचा वापर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्लायवूड पॅनल फर्निचर इंटेरियर व जलरोधक असल्यामुळे फ्लोअरिंग करणे जहाज वगैरे बांधणीसाठी होतो जागतिक तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंग कमी होण्यास मदत होते पर्जन्यमान सुधारणा पूर्व दुष्काळ नियंत्रणात अप्रत्यक्षरीत्या महोगनी वृक्ष लागवड वरदान ठरते पक्षी फुलपाखरे व मधमाशांचा नैसर्गिक अधिवास अनुकूलता महोगनी या वनशेतीमुळे होते.
रोपांची लागवड पद्धती(Swietenia Macrophylla)
एक एकर क्षेत्रासाठी लागवड पद्धतीनुसार चौकोनी झिगझॅक 444 500 रोपे लागते लागवडीचे दोन रोपांमधील अंतर दहा बाय दहा फूट आंतर पिकाच्या सोयीनुसार असावे बांधावरील लागवडीसाठी किमान 450 रोपे लावणे सरासरी खड्ड्यांची लांबी व रुंदी एक ते दीड फुटांची असावे.
महोगनी लागवडीसाठी चा येणारा खर्च प्रति एकर रुपये चोवीस हजार त्यामध्ये पाचशे रोपे 444 रोपे लागवडीसाठी व ५६ रोपे तुटीसाठी कंपनीकडून मिळतात.
महोगणी पासून एकरी उत्पन्न शेतकरी बंधूंचा होणारा फायदा शेतकरी बंधूंच्या प्लॉटला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर झाडांची उत्तम वाढ व सुस्थितीत असणाऱ्या झाडांना कार्बन क्रेडिट मोबदला प्रतिवर्ष प्रती एकर 5 OO झाडांवर तीस हजार रुपये प्रति वर्षे प्रमाणे झाड असेपर्यंत दरवर्षी मिळत राहतील महोगणी फळापासून मिळणाऱ्या बियांची सहाशे रुपये प्रति किलोने खरेदी केली जाईल बारा वर्षांमध्ये प्रति एकर किमान 6000 घनफूट लाकूड उत्पादित होईल व चालू बाजार भाव नुसार लाकडाची खरेदी केली जाईल शेतकरी बंधू बी व लाकडाच्या उत्पन्नावर दहा टक्के व कार्बन क्रेडिटच्या उत्पन्नावर पंधरा टक्के कंपनीला मार्गदर्शन हे देतील.
महोगनी या पिकाला कंपनीकडून शेतकऱ्यांना हमीभाव दिला जात आहे तो 600 रुपये प्रति घनफूट प्रमाणे आहे साधारण एका झाडाला 2O घनफुट जरी लाकूड पकडलं तरी अंदाजे किंमत 500 झाडांची कोटीत उत्पन्न मिळू शकते.
चला तर सर्वजण मिळून जैवविविधता व पक्षांचा नैसर्गिक अधिवास टिकवण्यासाठी वन शेती करूया पर्यावरण संवर्धनासोबत आर्थिक समृद्धी मिळवूया.
Comments
Post a Comment