Apple farming, Apple plant सफरचंद शेती

 

नमस्कार,शेतकरी मित्रांणो मि कृषी सल्लागार,एस.व्ही.धोते. आज आपण सफरचंद लागवड तंत्रज्ञान या विषयी लागवडी पासून ते मार्केटिंग पर्यंत माहिती पाहूया.

भारत देश सफरचंद उत्पादनात ५ व्या स्थानावर आहे,प्रतिवर्षी २२ लाख ३ हजार ४०० टन सेफ उत्पादन करतो. 

वरील हा पुणे येथील सफरचंद बागेचा फोटो आहे

सफरचंद हे कश्मीर,व हिमाचल प्रदेश मध्ये थंड वातावरणातच उगवते हे गैर समज दुर करा. कारण सफरचंदाला हिमाचल प्रदेश पेक्षा जलद वाढ ही महाराष्ट्रात होत आहे,१ झाडाला वाढ होण्यासाठी हिमाचल मध्ये १ वर्ष लागत आहे तर तीच वाढ महाराष्ट्रात ६ ते ७ महिने लागत आहेत कारण झाडांला वाढ होण्यासाठी व फळाना रंग व फळ परिपक्व होण्यासाठी पुरेपुर सुर्यप्रकाशाची गरज असते ती महाराष्ट्रात आहे,आता थंडीचा प्रश्न काय ?थंडी ही सुप्त अवस्थेत जाण्यासाठी थंडीची गरज असते तर फ्लावरींग ही मार्च एप्रिल मध्ये सुरूवात होत व फळ तोडणी ही ऑगस्ट सप्टेंबर मध्ये होते.

*सफर चंदाच्या जाती:-

१)हरमण ९९ ( २ )Anna 

३ ) Dorest.

वरील फोटो पुणे येथील सफर चंद ची बागेचा आहे

वरील फोटो चंद्रपुर जिल्हातील सफरचंद झाडांचा आहे


*लागवड हंगाम जमिण व पाणी : -

जून ते डिसेंबर लागवड करता येते,जमिन काळी,लाल,मुरमाड , माळराण,पाण्याचा निचरा होणारी,कमी पाण्यात ही पिक घेता येत.

लागवड अंतर: - ८X१२ किंवा १०x१० वर करावी लहान लहान अंतर पिके घेता येतात.जसे. झेंडू,कांदा,गाजर,पालेभाज्या, कडधान्य पिके इ.

रोग राई :- अति जास्त पाण्यामुळे पाने पिवळी पडतात, पाणी जास्त दिल्यामुळे मुळा सडू शकतात. इतर रोग कमीच आहेत.

*लागवड करतांना: - बेडवर करावी १X२ चे खड्डे करावे व खड्यात कुजलेले शेणखत टाकुन रोपाची एका सरळ रेषेत लागवड करावे.शक्य असल्यास मल्चींग चा वापर करावा व पाण्यासाठी ड्रीपचा वापर करावा,जेणेकरून पाण्याची बचत होईल व रोपांच्या गरजे नुसार पाण्याची मात्रा देता येईल.झाडांची गरजे नुसार छाटणी करून घ्यावी.दोन वर्षानंतरच फळ धरावी कारण झाड परिपक्व होते.फळ धरण्याअगोदर पाण्याचा ताण देणे आवश्यक असते. फळ् लागल्यावर झाडांवर जाळी टाकावी तसेच एकाच ठिकाणी फळांचा गुछा ससेल तर मधले काही फळ काढून टाकावी त्यामुळे फळाचा आकार वाढतो.

हरमण ९९ व्हरायटी बद्दल थोडक्यात परीचय : - हिमाचल प्रदेश मधील शेतकऱ्यांच्या मुलांनी हरमन शर्मा त्यांच नाव या जातीची निर्मिती केली ती १९९९ म्हणुन त्याला हरमन ९९ नाव ठेवण्यात आल. २८ देशात या जातीचा प्रसार झाला शर्मा यांना राष्ट्रपतींनी पुरस्कारांने सन्मानित केले.

हरमन ९९ फळाची वैशिष्ट ः- उष्ण कटिबद्ध वातावरणात येणारी व चांगले उत्पादन देणारी जात आहे,झाडांची उंची १० ते १५ फुट वाढते, ४८ c तापमानात ही फळ येते,या जातीची ३़.५ लाख झाडे लावली आहेत, २ वर्षांनी फळ देणारी जात,फळाची टिकवन क्षमता चांगली,चविला गोड,फळाचे वजन ३०० ग्रॅम,रंग चव व फळाच्या आकारमाना नुसार मार्केट चांगलीच मागणी असते.रोगांचे प्रमाण कमी,

*अर्थकारण: - प्रतिएकर खर्च व उत्पादन

*खर्च : -

१ रोप किं.२०० ते २५० रू

250×450=112500

रोपांची संख्या = ४५० 

रोपांचा खर्च साधारण = १ लाख

 ड्रीप=१०,००० रू

मल्चींग = १०,००o हजार

 मजुरी= ५,ooo

Total 1 लाख 25000 ru

*उत्पादन: -

एका झाडास २५ ते ३० फळ लागतात.

प्रति कि.भाव साधारण १०० रू मिळतो.

१०० रू भाव ग्रहीत धरा

सुरुवातीस दोन ते ३ लाख रू चे प्रति एकर उत्पादन मिळते.पुढे चालून वाढत जाते.

लागवड केलेली ठिकाणे:- नांदेड,पुणे,सोलापुर,नागपुर, नाशिक. ( फ्रुटींगला सुरूवात झालेले आहे. ) 

अश्या प्रकारे आपण कमी पाणी , कमी पैसा,कमी श्रम,कमी वेळेत भरगोस व शास्वत उत्पादन घेवू शकतो.कृपया लागवड करत असतांना तज्ञाच मार्गदर्शन घेवूनच लागवड करावे जेणे करून चूका होवून उत्पादनात घट होणार नाहीत.

नोट : - कृपया ही माहिती वाचून ईतर शेतकऱ्यांना पाठवावी ही विनंती.🙏

जेवतांना शेतकऱ्यांचे व झोपतांना जवानांचे आभार मानाय विसरू नका.धन्यवाद I

जय जवान I जय किसान । अन्नदाता सुखी भवं ः


    - कृषी सल्लागार,

    एस.व्ही.धोते.नांदेड.

 शेतकरी प्रगत करण्याच स्वप्न बाळगलेला माणुस🙏🏻🌳मो.8483900161 खात्रीचे रोप सल्ला व मार्गदर्शनसाठी शेतकरी बांधवांनी संपर्क करावे🙏☺️



टिप्पण्या