बांबू लागवड तंत्रज्ञान सविस्तर माहिती bambu farming


 *बांबू लागवड तंत्रज्ञान*

🙏नमस्कार, शेतकरी मित्रांणो मी कृषी सल्लागार एस.व्ही.धोते आज आपण बांबू  लागवड तंत्रज्ञान या विषयी माहिती पाहूया.कमी पाणी,कमी खर्च, कमी श्रमात,पन्नास ते साठ वर्ष उत्पादन घेता येईल ज्यांची जमिन पडीत आहे, माळरान आहे त्यांना खुपच फायदे मंद आहे.

अशी करा बांबू लागवड सविस्तर माहिती पुढील प्रमाणे...


# *बांबूच्या जाति*: - जगात 1200 तर 

देशात बांबूच्या जाती  140 आहेत.

महाराष्ट्रात प्रामुख्याने आढळणाऱ्या जाती 5 

मानवेल, कटांग,गोल्डन,तसेच कोकणात मांडगा व चिवार बांबू.

यामध्ये आपण कुठल्या जातीची निवड करावी यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे जात निवडत असतांना कुठल्या व्यवसायासाठी पाहीजे,कुठली बाजारपेठ उपलब्ध आहे,याचा विचार करूनच जातीची निवड करून लागवड करावी.

लागवड क्षेत्र : - आशिया खंडात प्रमुख्याने बांबू आढळतो त्यातील सर्वाधिक लागवड क्षेत्र भारतात आहे त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो लागवड क्षेत्राच्या बाबतीत भारत आघाडीवर असला तरी उत्पादन आणि बांबू वापराच्या बाबतीत मात्र चीन चा पहिल्या क्रमांकावर आहे बांबू वापराचे प्रमाण भारतात पण वाढवण्याची गरज आहे भारतात सध्या करा दशलक्ष हेक्‍टरवर नैसर्गिक बांबूची उत्पत्ती आहे त्यासोबतच संपूर्ण भारतात 50 हजार हेक्टरवर बांबू लागवड आहे.

आता भारतानंतर महाराष्ट्राचा विचार करूया महाराष्ट्रात जवळपास हा लाख हेक्‍टरवर नैसर्गिक बांबू आढळतो त्यामध्ये विदर्भातील गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसराचा समावेश आहे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील नैसर्गिक रित्या वनामध्ये बांबू आढळतो.

बांबू लागवडीला  प्रोत्साहन मिळण्यासाठी शाशनाचे प्रयत्न :-

केंद्र सरकारने एप्रिल 2018 पासून राष्ट्रीय बांबू मिशन याचे पुनर्घटन केले आहे भारतीय वन अधिनियम 1927 मध्ये सुधारणा करून बांबूला झाड या प्रकारातून वगळण्यात आले त्यामुळे आता शेतकऱ्यांना बांबूची लागवड कापणी व वाहतूक करणे सुकर झाले आहे केंद्र सरकारने बांबूच्या लागवडीला बांबूवर आधारित विविध उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत.

राज्यात बांधावर बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळावे याकरिता अटल बांबू समृद्धी योजना वनशेती उप अभियान वृक्षारोपण अशा योजना राबविण्यात येत आहेत.

उद्योगधंद्यात वापर वाढावा यासाठी राज्य शासनाने चंद्रपूर येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन केले आहे त्याचप्रमाणे विद्यापीठांमध्ये बांबू लागवड व व्यावसायिक उपयोग करून रोजगार निर्मिती याकरिता प्रकल्प राबविण्यात येत आहे.

# *मुख्य जाती* :- Tissue Culture बाल्कोबा,बांबूसा बांबू,टूल्डा,

बांबुचा वापर : - काठ्या साठी ,भाजीपाला बागेला सपोर्टीग साठी,फर्निचर साठी,लवकर कुजणारा,तिरडी साठी चालनारा,आपल्या सोयी नुसार निवड करावी.इथेनॉल व मिथेनॉलसाठी बांबूचा वापर होतो.पेपर साठीवापर होतो, पु‌‌ठ्यासाठी वापर होतो.

# *लागवड अंतर* :- 8×12 अंतरावर लागवड करावी.लहान लहान आंतरपिके घेता येतात, एका एकरात 450 रोपे बसतील. माझ्या मते बांबूमध्ये सधन लागवड किंवा इझरायल पद्धतीने लागवड करू नये कारण बांबू मध्ये जाण्यास फिरण्यास व तोडण्यास कठीण जाते.

# *बांधावर* :- बांबूचा वापर बांधानी,धूर्‍यानी किंवा नदी,नाले ओळाच्या जमिनी खचण्यापासून वाचतात व धुऱ्यांण्यांनी लावल्यास जनावरांचा त्रास कमी होतो इतर पिकांचे संरक्षण होते व जागेची बचत होवून अधिकचे उत्पादन मिळते.अंतर पाच फूट पद्धत झिग झॅग पद्धत W पद्धत वापरावे साधारण 240 रोप बस्तील.

# *लागवड खर्च*:- one time investment life time profit एकदाच लागवड आणी उत्पादन 50 ते 60 वर्षा पर्यंत मिळेल.

साधारण रोपांची किंमत 70 रुपये प्रति रोप.

                    70 × 450     

      रोपे        = 31500 रु.

Dreep        = 10,000

लागवड खर्च = 10,000

खते व इतर   = 10,000

__________________

टोटल खर्च =     61500

# *उत्पादन* :- एका बांबूची किंमत बाजारात 100रु आहे. होलसेल मध्ये 40 रु धरा एका झाडास साधारण दहा बांबू असतात,4० रू एका बांबुचा होलसेल चा रेट जरी धरलात 40×10= 400रु एका झाडापासून मिळतात.

400× 450=1,80,000एक लाख एंशी हजार अंदाजे उत्पादन मिळू शकते.एकदा लागवड केल्यास 50 ते 60 वर्षे उत्पादन मिळत राहते.दर वर्षी उत्पादनात वाढ होत राहते.बांबूला सर्वत्र मागणी आहे.one time investment  life time profit फर्निचर साठी वापरल्या जाणाऱ्या बांबूच्या किमती जास्त असतात पेपर साठी,इथेनॉल मिथेनॉल साठी जाणारा बांबू हा टनावर विकला जातो.

बांबूचा बल्लारशहा पेपर मिल चा सध्याचा रेट 

५१०० रू प्रती मॅटरीक टन ओला बांबु व वाळवलेला बांबु एकच रेट.

निलगीराचा रेट ३७०० रू प्रती मॅटरीक टन.बल्लारशहा पेपर मील चा रेट

# *मार्केट* :- इथेनॉल, मिथेनॉल,नागपूर,बल्लारशा,पेपर मिल,चंद्रपूर,लोकल,भाजीपाला रोप सपोर्टिंग साठी.नर्सरीत रोपांना सपोर्टीगसाठी.बांबु विकु शकता.स्वतःपन होलसेल शॉप टाकुशकता.

अशा प्रकारे बांबुची लागवड करून  अधिक चे उत्पादन घेऊ शकता.

*कृषी सल्लागार,

  एस.व्ही.धोते.

महाराष्ट्र हेड किसान स्पेस 

शेतकरी प्रगत करण्याचे स्वप्न बाळगलेला माणुस 8483900161*

Handcraft bambu products..







टिप्पण्या