जांभुळ लागवड तंत्रज्ञान संपुर्ण माहिती jambhul lagvad

कृषी सल्लागार,एस.व्ही.धोते.
यांचे mission 2020
पर्यावरण... संरक्षण.....संवर्धण..
🌳💧🌎💦🌴🌎🌤️💧

नमस्कार,शेतकरी मित्रांणो आज आपण जांभुळ लागवड तंत्रज्ञाण याविषयी माहीती पाहूया.
जांभुळ हे पिक कोरडवाहू पण सदाहरीत असते.जांभुळ लागवडकरा हमखास उत्पादन मिळवा.सध्या डायबेटीज ची संख्या दिवसें दिवस वाढत आहे एखादे घर सोडले तर हर घरात शुगर चा पेशेट सापडेल आणी जांभळ शुगर कमी करण्यास मदत करते मणुन जांभळाला अधिक मागणी तसेच किंमत मिळत आहे,तसेच जांभळाचा ईतर ही लोकांनी खाल्याणे भविष्यात शुगर होणार नाही चेहरा स्कीन टवटवीत शरीर तंदुरूस्त पोट साफ रहाण्यास मदत करते.

जांभुळाच्या जाती : -
१ ) राई २ ) थाई ३ ) बारडोली ४ ) बियाण्या पासुन तयार केलेली तसेच कलमी शक्य तो कलमी च रोप निवड करावी फळधारणा लवकर व जास्त होते.

जमिण व पाणी : - कोरडवाहू , काळी , मुरमाड , पाण्याचा निचरा होणारी.सुरुवातीचे दाेन वर्षे पाणी देणे गरजेचे असते.पहिल्या वर्षी पाणी हिवाळ्यात १० दिवसांनी तर उन्हाळ्यात ५ दिवसांनी पाणी द्यावे.किंवा गरजे नुसार पाणी दयावे, ड्रीपचा वापर केल्यास उत्तम राहील.
फळाला १ वर्षानी सुरू होते झाड परिपक्व  झाल्यानंतरच फळ धरावी, फळाला सुरूवात झाल्यावर एप्रिल , मे , जुन , या तीन महिने पाण्याची नितांत आवश्यकता असते या कालावधी फळधारणेचा असतो त्यामुळ पाणी अधिक लागत.

लागवड :- एक एकर साठी लागणारा अंदाजीत खर्च :
प्रतिरोप किंमत बियाणे रोप ४० रू
कलमी रोप ८० ते २५० रोपांचा दर कमी जास्त होवू शकतो खात्रीची रोप रोपांची उंची बॅग साईज यानुसार.ट्रान्सपोर्ट्
१ ) १०० रू दर
 १०० x ५००=५०,००० ची रोपे
२ )१०,००० खते.
३ )१०,००० मजुरी.
४ )१०, इतर.
TOtaI=८०,००० खर्च

लागवड अंतर ७ x १४, १० x १५
शक्य तो सद्यन लागवड पध्दत वापरावी रोपांची संख्या जास्त बसवावी जेने करुन उत्पादनात वाढ होईल वेळ व श्रम तेवढाच लागेल. दुर मार्केट ला माल पाठवतांना गाडी लोड होण्यास मदत होते दर जास्त मिळतो.
खड्डे १ x १ करावे खड्यात शेणखत निंबोळी खत ,टाकुन रोप लावणी करावी.

रोप लावणी झाल्यावर रोपांना बुडाला दोन्ही पायाच्या तळव्यांनी किंवा चिमंटी द्यावी.

वेळोवेळी गरजेनुसार , शेणखत ,सेंद्रीय तसेच वीद्राव्य खतांची मात्रा द्यावी.
मधुमक्षी साठी बागेवर गुळाचे पाणी फवारणी करावी.

उत्पादन सुरूवातीला साधारण ३ टनापर्यंत मिळते ते वाढत जावून दहा बारा टन उत्पादन दरवर्षी मिळ्त रहात.

उत्पादन काढणी करतांना योग्य ती काळजी घ्यावी प्रतवारी करूण पॅकींग करुन स्वत ही मॉल , होम डीलेव्हरी मोठया बाजार पेठेला पाठवता येते.
साधारण भाव १५० ते २५० रू किलो पर्यंत मिळतो.साधारण ३ ते १० लाख पर्यंत उत्पादन मिळू शकत.खर्च वजा जाता वर्षाकाठी ३ ते ४ लाख उत्पादण हमखास मिळत राहील.

जांभळी ही रोगराई कमी जोमाची वाढ व वातावरणास पोषक कोणत्याही वातावरणात सुट होणारी व हमखास उत्पादन देणारी बाग आहे.

अशा प्रकारे शेतकरी बांधवांनी जांभुळ या पिकाकडे वळावे अशि मि विनंती करतो.


जेवतांना शेतकऱ्यांचे व झोपतांना जवानांचे आभार मानाय विसरू नका I जय जवान ।जय किसान ।
अन्नदाता सुखी भवं:

- कृषी सल्लागार
 एस.व्ही.धोते.
 अध्यक्ष कृषी रोज
शेतकरी प्रगत करण्याचे स्वप्न बाळगलेला माणुस 🙏
मो.8483900161
🌳💧🌎🌳💧🌴🌎🌳









टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा