पेरू लागवड तंत्रज्ञान तैवान taivan Peru lagvad

नमस्कार,शेतकरी मित्रांणो आज आपण पेरू लागवड तंत्रज्ञान या विषयी लागवडी पासून ते मार्केटिंग पर्यंत माहिती पाहूया.

*पेरूच्या जाती:-
Tissu cuIture , CI०ne ,कलमी गुटी कलमी
१ ) तैवान मध्ये पिंक व सफेद २ )ललित ३ ) सरदार ४ ) लैखनौ ४९ ५ ) अर्का किरण ६ ) G विलास ७ ) अलाहाबाद सफेदा. ८ ) V N R

*लागवड हंगाम जमिण व पाणी : -
१२ महिने लागवड करता येते, जमिन काळी, लाल , मुरमाड , माळराण , पाण्याचा निचरा होणारी , कमी पाण्यात ही पिक घेता येत.

लागवड अंतर: - ६x१० ,6*12, ८x१२ , ८.५x५ , किंवा ६X९ घनदाट पद्धतीने केल्यास ईझराईल तंत्रज्ञान ,एकरी १,००० रोपे बसतात.

*लागवड करतांना: - १X१ चे खड्डे करावे व खड्यात कुजलेले शेणखत टाकुन रोपाची एका सरळ रेषेत लागवड करावे.व पाण्यासाठी ड्रीपचा वापर करावा, जेणेकरून पाण्याची बचत होईल व रोपांच्या गरजे नुसार पाण्याची मात्रा देता येईल.

 फळाची वैशिष्ट ः- फळाची टिकवन क्षमता ८ते १० दिवस,चविला गोड , बीयांचे प्रमाण कमी , गराचे प्रमाण जास्त , फळाचे वजन ३०० ग्रॅम ते १ किलो.रंग चव व फळाच्या आकारमाना नुसार मार्केट चांगलीच मागणी असते. रोगांचे प्रमाण कमी फळ माशीसाठी योग्य वेळी फवारणी करून घ्यावे.

*अर्थकारण: - प्रतिएकर खर्च व उत्पादन
           
*खर्च : -
१ रोप किं.65ते ७० रू
७० X १,००० = ७०, ००० हजार रोपांचा खर्च
                      १०,००० रू चे ड्रीप
                      १०, ००० रू मजुरी
                      १०, ००० रू इतर खर्च
       एकंदरीत प्रति एकरचा खर्च १ लाख रू

 *उत्पादन: -
एका झाडास २० ते ३० कि.माल मिळतो.
प्रति किला भाव ३० ते ६० रू मिळतो.
२० रू होल सेल भाव ग्रहीत धरले तर
२०X३० = ६०० रू एका झाडास मिळतात.
६००X१,०००=६ लाख रू चे प्रति एकर उत्पादन मिळेल.

अश्या प्रकारे आपण कमी पाणी , कमी पैसा ,कमी श्रम , कमी वेळेत भरगोस उत्पादन घेवू शकतो.कृपया लागवड करत असतांना तज्ञाच मार्गदर्शन घेवूनच लागवड करावे जेणे करून चूका होवून उत्पादनात घट होणार नाही, तसेच लागवड झाल्यांनंतर उत्पादन घेत असतांना मार्केटचा विचार करून नियोजन व व्यवस्थापण करावे, जसे की मार्केट जवळ आहे , का दूर , योग्य मार्केट कुठ असेल , त्यासाठी नियोजन वेगळे करावे , उत्पादन घेत असतांना उत्पादन टप्पा टप्प्यांने घेणार की एकाच वेळी , कि वर्षभर याच नियोजन उत्पादनात खुप महत्व असत.

नोट : - कृपया ही माहिती वाचून ईतर शेतकऱ्यांना पाठवावी ही विनंती.🙏

जेवतांना शेतकऱ्यांचे व झोपतांना जवानांचे आभार मानाय विसरू नका.धन्यवाद I
जय जवान I जय किसान । अन्नदाता सुखी भवं ः

     - कृषी सल्लागार,
    एस.व्ही.धोते.नांदेड.
      अध्यक्ष कृषी रोज
    मो. ८४८३९००१६१

                         अजंणी येथील पेरू बाग 


कृषी सल्लागार,एस.व्ही.धोते यांच्या मार्गदर्शनाखालील पेरू बाग यांनी खात्रीची रोपे दिली होती.लागवड करून १२ महिण्यात १ झाडास ४ फळ धरले होते भाव ६० रू मिळाला शेतकऱ्यांचे नाव शिवराज पा.हांडे.गाव अजंणी.जि.नांदेड.











टिप्पण्या