माझ्या बाप्पाचा सातबारा कोरा कधी होणार , किती दिवस असच कर्जाच डोंगर डोक्यावर घेवून फास घेत रहाणार. शेतकरी बाप.
प्रत्येक तालुक्यात दोन आमदार आजी आणी माजी अपक्ष तसेच जिल्हात खासदार तहसिल दार कलेक्टर हे सर्वच फिरतच आहेत किती दिवस फिरत रहाणार किती दिवस सर्वे व पंचणामे करत फिरणार मंत्री मंडळ कधी स्थापन होणार अद्यापही शपत विधी झाला नाही मग शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळेल नुकसान भरपाई कधी मिळेल शेतकरी संपल्यावर का ? एक एक दिवस शेतकऱ्यांचा कमी होत आहे आणी मंत्री मंडळ समोर ढकलण्यावर आहेत एकदंरीत स्वतःच्या हितासाठी शेतकऱ्यांचा जीव किती धोक्यात जात आहे याची जाणी नेत्यांना राहीली नाही. आमचा शेतकरी बाप रात्री घरी येजे पर्यंत भरवसा राहीला नाही घरी येते का झाडाला फास घेते याची चिंता लेकर व बायका करत आहेत.किती शेतकरी फास लावायला ही सुरू केली याची आकडेवारी ही दाखवणार नाहीत. पिकाचे पंचनामे सोडा शेतकरी आत्महत्या चे पंचनामे झाल्यावर मदत जाहीर करणार का ? अस माझ् या सर्व नेते व मंत्री सरकारला विचारणे आहे , वाट कशाची पहाताय हे राज्यच नाही तर संपुर्ण देश कृषी प्रधान देश आहे ८o" % लोक भारतात शेती करतात, सर्व उद्योग धंदे शेतीवरच अवलंबुण आहेत, सतत नापीकी , दुष्काळ व यंदा अतिवृष्टी मुळे शेतकरी संपुर्ण कर्जात बुडाला असून यंदा तरी अपेक्षा होती चार पैसे होतील म्हणायची पण तोंडाचा घास निर्सगाणे हिसकावला , आता आत्महत्या शिवाय शेतकऱ्याकडे पर्याय नाही, पण मायबाप शेतकरी मित्रा तु धिर सोडू नको , खचू नको तु लढ पण मरू नको , माझे शाशनास यवढीच विनंती आहे, जर शेतकरी जगावा वाटत असेल , पुन्हा उभा करायचा असेल तर ,शेतकऱ्याचा एकदा तरी सातबारा कोरा करून , एक वेळा पुन्हा उभा राहण्याची संधी द्यावे , नविन कर्ज देवून भरीव आर्थिक मदत करावी तरच शेतकरी टिकेल , शेतकरी जगेल , आणी शेतकरी जगला तरच देश जगेल, देशाची आर्थिक श्रोत हे एकमेव कृषीवरच आहे म्हणून इतर योजना , युक्त्या सर्वच फेल आहेत, कृषी ला चालना दिल्याशिवाय शेतकरी श्रीमंत प्रगतशील झाल्याशिवाय देश कधीच प्रगत होणार नाही, देशाच्या अर्थ तज्ञाना हे समजायला हव की आपल्या देशाची धुरा अर्थीक श्रोत मुख्य काय आहे ,कशावर भर दिला पाहीजे,शेतकऱ्यांना जेवढ माग आनताल तेवढाच देशाचा पाया घसरेल आर्थिक स्थिती ढासाळेल इतर किती ही प्रयत्न करून आर्थिक पाया सुधारणार नाही,एकमेव पर्याय कृषी प्रधान देश घडवणे, केवळ डिझीटल इंडियाने उपयोग होणार नाही , व्यवसायात वाढ होणार नाही , बाजारात तेजी येणार नाही , शेतकऱ्यांचे कर्ज मुक्त होणार नाही, शाशनानी लवकर निर्णय घेवून शेतकरी आत्महत्या थांबवू शकते,हीच विनंती तस शाशनास समजावण्यासारखा तज्ञ मी नाही एक शेतकरी व शेतकऱ्याचा मुलगा मणून शेतकरी बाप जगावा म्हणून एक तळमळ आहे.
-कृषी सल्लागार,
एस.व्ही.धोते.
महाराष्ट्र हेड किसान स्पेस.
जय जवान I जय किसान I अन्नदाता सुखी भवं ः
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा