Colour capsicum कलर कॅपसुकम लागवड तंत्रज्ञान,शिमला मिर्ची लागवड .



Colour capsicum

*Type of colour capsicum: -6

1) red colour
2) yellow colour
3) green colour
4) black colour
5) orange colour
6) purple/wailet colour

नमस्कार,शेतकरी मित्रांणो आज आपण colour capsicum या भाजीपाला पिका विषयी माहीती पाहूया. यालाच आपण गावठी भाषेत कलर मिर्ची किंवा शिमला मिर्ची म्हणतो. याच शिमला मिर्चीला बाजारात मोठी मागणी आहे. आपल्या आठवडी बाजार किंवा भाजी मंडी मध्ये ही मिर्ची आढळते, पण ती एकाच कलर मध्ये ती मणजे हिरवा. यालाच विवीध रंगामुळे तीला colour capsicum असे ही मणतात.या मिर्चीचा आर्कर्षक रंगामुळे हॉटेल , रेस्टॉंरेंट , परदेशात चांगली मागणी असते. हे पिक मोकळ्या रानात कमी उत्पादन तर पॉलीहाऊस मध्ये उत्तम उत्पादन मिळु शकते.पॉली हाऊस मधील कॅप्सी कम ला चांगली मागणी आहे.पॉली हाऊस मुळे रोगराईचे प्रमाण कमी असते, इतर खर्च वाचतो, उच्चत्तम कॉलीटी मिळते. उत्पादनही वाढते म्हणुन लागवड ही शक्यतो पॉली हाऊस मध्येच करावी. ज्यांच्याकडे अगोदरचे पॉली हाऊस असेल त्यांनी या पिकाच उत्पादन घेऊन पहावे नक्कीच फायदा होईल.

*थोडक्यात उत्पादनावर लक्ष देऊ 
* लागवडीसाठी अशा प्रकारचे पॉली हॉसची गरज भासेल.


१ एकर पॉली हाऊस केल्यानंतर आतमध्ये जमीनीचे माती परीक्षण करून द्यावे व सल्लानुसार पुढील नियोजन करावे.
बेड तयार करतांना खालील खते वापरावी १०० ब्रास लाल मातीत शेनखत,भेसळढोस , सिंगल सुपर फॉस्फेट , अमोनियम सल्फेट, निबोळी पेढ , झिक , मॅग्नेशियम , बोन मिल ,बोरॉन इ.बेड तयार करणे.




* रोपे लागवड करतांना बेडवर ड्रीप अंथरून रोपे झिग झॅग टाईप मध्ये लागवड करावे . दोन रोपामधील अंतर ४० सेमी ठेवावे. याप्रमाणे लागवड केल्यास एकर मध्ये १२ हजार रोपे बसतील. अंदाजे ३५ ते ३६ बेड होतील. ड्रीप द्रवारे पाणी व खते,1919,12610, बोरॉन , मयक्रो न्युट्रीयन , चिलेटेड , झिंक , कॅलशी यम नायट्रेट देणे. प्रॉडक्शन चालू झाल्यावर 12610 बंद करून 0050,05234, मायक्रोन्युट्रीयन , कॅल्शी यम  नायट्रेट , झिंक , चिलेटेड , फेरस चालू ठेवावे. दररोज तीन दिवसांनी वेगळ सेडूल असत तीन दिवस कॅल्शीयम नायट्रेड आणी फेरस असतं. दररोज १० ते १२ हजार लि पाणी लागते. १ झाडाची उंची १० फुट असते. १ झाडास साधारन १० कि माल निघतो. Tempture mentione साठी फॉर्गस चा वापर केला जातो.रात्रीच्या वेळी पुर्ण पॉली हाऊस बंद करणे, जेवढा कार्बण डायऑक्साईड बंद कराल तेवढे उत्पादन वाढते. सकाळी बाजुची प्लास्टीक खुल्या कराव्या सुर्य प्रकाश मिळण्यासाठी. लागवड केल्यापासुन ८० ते ८५ दिवसांनी तोडा होतो. एक एकरात साधारण ४० टन माल मिळतो.

*Total खर्च :-
polihouse 1 ekar =40 lakh
खते २ लाख ५० हजार
बुरशीनाशके ६० हजार
रोपे १ लाख रू ची
ड्रीप व इतर खर्च ५० हजार
-------------------------------------
Total 45 लाख खर्च 

* उत्पादन १ एकर : -minimum production
१ रोप ५ कि माल
१ कि भाव ३० रू
५ कि माल X१२ हजार रोपे= ६० हजार कि माल
६० हजार कि X३० रु भावाने १८ लाख उत्पादन

* वार्षीक उत्पादन सरासरी १८ ते २० लाख 

* अनुदान : -राष्ट्रीय फलोत्पादनाकडून मिळते.

* मार्केट : - दिल्ली , पुणे , मुंबई , परदेशात मोठी मागणी, रेस्टॉरेंट , मॉल ,इ. मालाची प्रतवारी करणे व माल बाजारात पाठवणे.साधारण भाव ४० ते २०० पर्यंत मिळतो.
  -
ही शेती सामान्या शेतकऱ्यांना परवडण्या योग्य नसली तरी याची लागवड चांगल्या प्रकारे करणारे शेतकरी आहेत. अश्या प्रकारे शेती करून आपल्या उत्पादनात भर पाडावे. Mkधन्यवाद I
जेवतांना शेतकऱ्यांचे व झोपताना जवानाचे आभार मानाय विसरू नका .जय जवान जय किसान I अन्नदाता सुखी भवं
   
     -कृषी सल्लागार,एस.व्ही.धोते.नांदेड
       महाराष्ट्र हेड किसान स्पेस.
       मो.8483900161

टिप्पण्या