चला वळुया फुल शेतीकडे.गुलाब लागवड
नमस्कार,शेतकरी मित्रांणो आज आपण गुलाब लागवड ज्याला आपण फुलशेती असे म्हणतो,आज सदय परिस्थीती पहाता सर्वत्र फुलांना प्रचंड मागणी वाढत आहे ,मणुन शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे वळणे फायदयाचे ठरू शकते.
आपण गुलाब या शेतीचा उत्पादन व खर्च यावर एक नजर टाकुया.
लागवड 10 गुंठ्याचा शेडनेट मधील सरासरी आढावा पाहूया.पुढील प्रमाणे....
गुलाबाची व्हराईटी,टॉप सिकरेट,शिरडी गुलाब,ड्डच गुलाब, जनरल गुलाब.
रोपांची किंमत 7 रू ते 15 रु.
10 गुंठ्ठे मध्ये ३,००० ते ४,००० रोपे.
लागवड ही बेडवर करावी.दोन बेड मधील अंतर 1.30 fut.उंची 4 fut.
एका बेडवर दोन्ही साईडनी 6 इंचावर लागवड करावी.
लागवड केल्या 2 ते 3 महिण्याणी उत्पादनास सुरूवात होते,सुरुवातीला 10 kg परडेला माल निघतो तर ते 15 kg पर्यंत वाढत जातो.
गुलाबाला साधारण 80 kg चा भाव मिळतो.
एकदा लागवड केल्यास चार वर्षापर्यंत बाग चालते.
लागवडीचा सुरूवातीचा खर्च साधारण एक लाख.मजुरी रोप व ड्रीप पकडून.
सरासरी वार्षिक उत्पादन 10 गुंठ्यांत तीन ते चार लाख.
रोगराई प्रमाण शेडनेट मध्ये अट्याक करू शकते.वरील टॉप सिकरेट या व्हराईटीचा आढावा दिला आहे.
प्रताप बापुराव वाघमारे जि.नांदेड येथील गुलाबाची लागवड.
पॉलीहाऊस मध्ये रोगांचे प्रमाण फार कमी.लागवडीसाठी ड्डच गुलाब किंवा शिर्डी गुलाब चांगला.उत्पादन चांगले मिळते.व मागणी पण चांगली आहे.या गुलाबाचा एक गठ्ठा २० फुलांचा असतो.साधारण १५० ते २०० रू चा एक गठ्ठा.सुरूवातीला परडे ला २५ ते ३० गठ्ठे तर वाढत जाऊन ७० गट्ठे पर्यत परडेला उत्पादन मिळते.दर तीन महीण्यानी माती परीक्षण करत रहावे,जेने करून कमी जास्त प्रमाण लक्षात येते किंवा जमिनीत कोणत्या घटकाची आवश्यकता आहे हे समजते.व् उत्पादनात वाढ करता येते.अशा पध्दतीने शेतकरी फुलशेतीची लागवड करून शेती अधिक फायद्याची करावी.धन्यवाद I
- कृषी सल्लागार,
एस.व्ही.धोते.नांदेड.
महाराष्ट्र हेड किसान स्पेस.
मो.8483900161.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा