Goat farming shed शेळीपालन शेड उभारणी कशी करावी थोडक्यात माहिती.


नमस्कार, शेतकरी मित्रांनो, आज या भागात आपण पाहणार आहोत शेळीपालन करत असताना शेड बांधनी कशीअसावी या विषयी थोडक्यात शेड चे काही फोटो दिली आहेत व थोडक्यात माहिती पन या ठिकाणी आम्ही देत आहोत, आपल्या बजट नुसार व जागा आणि शेळ्यांची संख्या या नुसार तुम्ही करू शकता.शस्क तो शेडची बांधनी ही वरील फोटोत दाखवली त्याप्रमाणे करावा जेनेकरून शेळी लघवी किंवा लेडी हे लाकडी फळी तुन खाली पडेल व वरती शेळीला घान होणार नाही व ओलावा होत नाही त्यामुळे इतर बिमारीपासुन शेळीचा बचाव होतो.


शेड मधे अशा लाकडी पाटी चा फळी चा वापर करावा जेनेकरून शेळीची लेढि व लघवी ही खाली पडेल,व अशि लाकडी पाटी मुळे जमीन ओली राहील्याने सरदी,खुराचे पायाचे अजार होत असतात,आणि खाली जमीन चाटल्याणे लाळेवाटे जमीणीचे जंतु पोटात जाऊन जे छोटे मोटे आजार जडतात त्यापासून बचाव होतो,उन्नाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम अशी उब शेळ्यांना लाकडी फळ्या देत असतात,त्यामुळे लाकडी फळ्याचे खुप महत्त्व आहे,जर लाकडी फळ्या परवडत नसतील तर बांबुची तटी किंवा जर शेड जमीन लेवल असेल तर जमीन चांगली निवडावी किंवा जमिनीवर आडव्या विटा आंथरून पन करू शकता,जेने करून लघवी ते विटा शोशुन घेतील जमीन ओली रहाणार नाही.

 शेळ्यांची संख्या व शेडचा आकार व आपल्या उपलब्ध जागेनुसार वरील फोटोत दाखवल्या प्रमाणे शेडच्या समोर शेळ्यांना पाच पावली म्हणतात तसे पाये मोकळे करण्यासाठी व खालेल अन्न पचन होण्यासाठी मोकळी थोडी का होईना जागा सोडावी जेनेकरून शेळ्या हिवाळ्यात उन खातात व फिरत असतात, दीवसातुन दोन वेळा तरी त्यांना मोकळ्या जागेत फिरू द्यावे.


शेडमधे मध्यभागी अशी जागा सोडावी जेनेकरून आपण चारा टाकण्यासाठी जाऊ शकतो व पहाणी करण्यासाठी शेवटपर्यंत जाता येते व सर्व शेळ्याना खाद्य व पाणी पाजता येते.


 शेडच्या समोर जी जागा सोडली त्या जागेमधे अशी जागो जागी पाणी ठेवावे पोटभर पाणी त्यांना मिळाल पाहिजे.


शेडच्या समोरील जागेत असे चारा खाण्यासाठी गव्हान किंवा टोपले ठेवावे जसी भुक लागेल त्याप्रमाणे खात रहातील,भरपुर चारा आणि पाणी याची व्यवस्था करावी,उत्तम आरोग्य बनण्यासाठी पुरक आहार आणि पाणी आवश्यक असते.आहार आणि आरोग्य चांगले झाले तर व्यवसाय चांगला होईल.उत्तपन वाढेल.

खाली काही शेडची फोटो आहेत आपल्या बजट व सोईनुसार हलके भारी शेडची उभारणी करावी. सुरूवात असेल तर नवीन असाल तर कमी भांडवल व कमी शेळ्या व झोपडी पाचट व कडबा ताटवा वापरून करावे.जसा अनुभव येईल त्याप्रमाणे व्यवसायात वाढ करू शकता,

शेळी ही गरीबाची गाय अस म्हटले जाते.
आणि शेळी पालनात जगात भारताचा प्रथम क्रमांक आहे.
   -कृषी सल्लागार,
      एस.व्ही.धोते.
महाराष्ट्र हेड किसान स्पेस
मो.8483900161










Comments